• संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) १ जानेवारी २०२१ रोजी ६३ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • संरक्षण क्षेत्रात संशोधन कार्य वृद्धिंगत करण्यासाठी १९५८ मध्ये DRDO ची स्थापना करण्यात आली होती.

  • भारतीय सशस्त्र दलांसाठी त्या काळी अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाची आखणी व विकास करण्याचे काम आयोजिले होते.

DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.

  • अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.