-
एम्मी पुरस्कार नामांकित भारतीय नृत्यदिग्दर्शक सुरेश मुकुंद यांनी नुकताच १० वा वार्षिक ‘जागतिक नृत्य दिग्दर्शन पुरस्कार (World Choreography Award) २०२०’ जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही रिअॅलिटी शो ‘वर्ल्ड ऑफ डान्स (World of Dance)’ मधील कामगिरीबद्दल त्यांना ‘टीव्ही रिअॅलिटी शो / स्पर्धा’ प्रकारात सदर पुरस्कार मिळाला आहे.
-
मुकुंद हे भारतीय नृत्यगट ‘द किंग्ज’ (The Kings) चे दिग्दर्शक तसेच नृत्यदिग्दर्शक आहेत त्यांनी 'वर्ल्ड ऑफ डान्स' चा २०१९ चा हंगाम जिंकला होता.