-
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील परीतेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना '२०२० चा ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Prize)' मिळाला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय बनले आहेत.
-
त्यांना १ दशलक्ष डॉलर्स (७.४ कोटी रुपये) इतक्या रकमेचे बक्षीस मिळाले आहे.
-
आपल्या गावात मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मान्यता मिळाल्यामुळे तसेच त्वरित-प्रतिसादात (क्यूआर) कोडेड पाठ्यपुस्तक क्रांतीच्या [Quick-Response (QR) coded textbook revolution in India] प्रेरणेवर आधारित भारताच्या या ३२ वर्षीय शिक्षकाने सदर वार्षिक ग्लोबल टीचर पुरस्कार जिंकला आहे.
-
सदर पुरस्कारासाठी जगातील ९ अंतिम स्पर्धकांना अर्ध्या बक्षिसाची रक्कम वाटून देण्याची घोषणा करून रणजितसिंह यांनी इतिहास रचला आहे ज्यानुसार प्रत्येकाला सुमारे ५५००० डॉलर्स दिले जातील.
-
अंतिम स्पर्धकांसह आपल्या बक्षिसाची रक्कम वाटून घेणारे ते पहिले विजेते ठरले आहेत.
ग्लोबल टीचर पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती
-
पुरस्कार स्वरूप: ग्लोबल टीचर प्राइज हा एक वार्षिक स्वरूपाचा पुरस्कार आहे
-
पुरस्कार स्थापना: सदर पुरस्कार वर्क फाऊंडेशनमार्फत (Varkey Foundation) २०१४ मध्ये स्थापन करण्यात आला होता ज्यात एका अपवादात्मक शिक्षकाला उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात येते.
-
भागीदारी संस्था: युनेस्कोच्या भागीदारीत सदर पुरस्कार देण्यात आला आहे.
UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.