• दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी जागतिक स्वच्छतेच्या संकटावर मात करण्याच्या कृतीसाठी 'जागतिक शौचालय दिन (World Toilet Day - WTD)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा स्वच्छतागृहांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करतात.

  • सदर दिवस मुख्यतः जागतिक स्वच्छता संकटावर मात करणे आणि 'शाश्वत विकास लक्ष्य क्रमांक ६: २०३० पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता (Sustainable Development Goal ६: water and sanitation for all by २०३०) साध्य करणे' या उद्देशांसाठी कार्यवाही करण्याविषयी आहे.

  • २००१ मध्ये जागतिक शौचालय संघटनेमार्फत सदर दिवस स्थापन करण्यात आला आणि २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेद्वारे अधिकृतपणे घोषित करण्यात आला होता.

  • २०२० सालची या दिवसाची थीम 'शाश्वत स्वच्छता आणि हवामान बदलाचे (Sustainable sanitation and climate change)' महत्व अधोरेखित करते.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.