• दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय दारिद्रय निर्मूलन दिन (International Day for the Eradication of Poverty)' जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील खासकरून विकसनशील देशांमध्ये दारिद्रय निर्मूलनाबाबत जागरूकता वाढविणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'सर्वांसाठी सामाजिक आणि पर्यावरणीय न्याय मिळविण्यासाठी एकत्र काम करणे (Acting together to achieve social and environmental justice for all)' ही आंतरराष्ट्रीय दारिद्रय निर्मूलन दिनाची २०२० साठीची थीम आहे.

संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.