-
दरवर्षी १७ जून रोजी 'जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळाविरुद्ध लढा देण्यासाठीचा दिवस (World Day to Combat Desertification and Drought)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस वाळवंटीकरण तसेच दुष्काळाच्या उपस्थितीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्याच्याविरुद्ध लढा देण्याच्या पद्धतींना अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो.
-
'जीर्णोद्धार. जमीन. पुनर्प्राप्ती. आम्ही निरोगी भूमीसह चांगले पुनर्निर्माण करू. (Restoration. Land. Recovery. We build back better with healthy land)' ही २०२१ सालच्या जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळाविरुद्ध लढा देण्यासाठीच्या दिवसाची थीम आहे.
-
१७ जून हा दिवस १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत जाहीर करण्यात आला होता.