-
दरवर्षी १७ एप्रिल रोजी 'जागतिक हिमोफिलिया दिन (World Hemophilia Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा हिमोफिलिया तसेच रक्तस्त्राव विकारांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
-
वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियाचे संस्थापक फ्रँक स्नाबेल यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा करतात.
-
२०२१ हे वर्ष जागतिक हिमोफिलिया दिनाची ३० वी आवृत्ती आहे.
-
'रुपांतरासाठी अनुकूल बनणे: नवीन जगामध्ये शाश्वत काळजी घेणे (Adapting to Change: Sustaining care in a new world)' ही २०२१ सालच्या जागतिक हिमोफिलिया दिनाची थीम आहे.
-
सदर दिवस १९८९ पासून साजरा केला जात आहे