-
संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दर वर्षी ओझोन थराच्या संरक्षणासाठी १६ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय ओझोन दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
ओझोन वायूचा थर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून ढालीप्रमाणे पृथ्वीचे रक्षण करतो ज्यामुळे ग्रहावरील जीवांना रक्षण प्राप्त होते.
-
'आयुष्यासाठी ओझोन: ओझोन थराच्या संरक्षणाची ३५ वर्षे (Ozone for life: 35 years of ozone layer protection)' ही २०२० सालासाठी या दिवसाची थीम आहे. याद्वारे व्हिएन्ना परिषदेची ३५ वर्षे अधोरेखित होतात.
-
१९८७ मधील ओझोन थराबाबतच्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत १९ डिसेंबर २००० रोजी हा दिवस जाहीर करण्यात आला होता.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाबाबत (UNEP) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNEP म्हणजेच United Nations Environment Programme अर्थात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम होय.
-
स्थापना वर्ष: ५ जून १९७२ रोजी UNEP ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नैरोबी, केनिया हे UNEP च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
कार्यकारी संचालक: इनगर अँडरसन हे सध्या UNEP च्या कार्यकारी संचालक पदावर विराजमान आहेत.