• दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी 'जागतिक अन्न दिन (World Food Day - WFD)'  जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा जगभरातील भूक निर्मूलन कार्यासाठी साजरा करण्यात येतो.

  • सदर दिवस उपासमारीने पिडीत लोकांसाठी अन्न सुरक्षा आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करतो.

  • 'वाढवा, पोषण करा, टिकाव धरा. एकत्र (Grow, Nourish, Sustain. Together)' ही २०२० सालाची या दिवसाची थीम आहे.

  • 'अन्न हा मूलभूत मानवी हक्क आहे' या बाबीवर सदर दिवसाचे मुख्य लक्ष केंद्रित आहे.

अन्न व कृषी संघटनेबाबत (Food and Agriculture Organization - FAO) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९४५ साली संस्थेची स्थान करण्यात आली होती.

  • संस्थेचे प्रमुख: क्यू डोंग्यू हे सध्या संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: रोम, इटली हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.