-
'आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन (International Day of Light - IDL)' दरवर्षी १६ मे रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता असणाऱ्या थियोडोर मैमन यांनी १९६० मध्ये लेसरच्या पहिल्या यशस्वी ऑपरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सदर दिवस साजरा करण्याचे ठरवले होते.
- 'विज्ञानावर विश्वास ठेवा (Trust Science)' ही २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय प्रकाश दिनाची थीम आहे.
UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.