• दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय अभियंता दिन (National Engineer’s Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • देशाच्या विकासामध्ये अभियंत्यांच्या असणाऱ्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • सदर दिवस भारताचे अभियांत्रिकी प्रणेते म्हणून विख्यात असणाऱ्या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती आहे.

  • १९५५ साली त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल त्यांना देशातील सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • १९६८ मध्ये भारत सरकारमार्फत सर एम. विश्वेश्वरय्या यांची जयंती 'अभियंता दिन' म्हणून साजरी करण्याचे घोषित करण्यात आले होते.