• भारतामध्ये दरवर्षी १५ ते २१ नोव्हेंबर दरम्यान 'राष्ट्रीय नवजात सप्ताह (National Newborn Week)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • राष्ट्रीय नवजात सप्ताह २०२० हा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

  • नवजात बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्राधान्य क्षेत्र म्हणून महत्त्व वाढविणे तसेच नवजातपूर्व मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊन बालमृत्यू दर कमी करणे हा या आठवड्यामागील मुख्य उद्देश आहे.

  • ‘प्रत्येक नवजात मुलासाठी प्रत्येक आरोग्य सुविधा आणि प्रत्येक ठिकाणी गुणवत्ता, नि:पक्षपात आणि सन्मान (Quality, Equity, Dignity for every newborn at every health facility and everywhere)’ ही राष्ट्रीय नवजात सप्ताह २०२० ची थीम आहे.