• राष्ट्रीय अभियंता दिन हा देशाच्या विकासात अभियंत्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी १९६८ पासून दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रणेते असणाऱ्या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जे 'सर एमव्ही' म्हणूनही प्रसिद्ध आहेत यांचा जन्मदिवस आहे.

  • 'आधुनिक म्हैसूरचे जनक' म्हणून सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ओळखले जात होते.

  • १९५५ मध्ये भारत निर्माणाबाबतच्या त्यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांना सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.