-
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाद्वारे जगातील लोकशाहीबाबतच्या स्थितीचा आढावा घेण्याची संधी प्राप्त होते.
-
२००७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेमार्फत लोकशाही प्रोत्साहन व एकत्रिकरण या संदर्भातील राष्ट्रीय कार्यक्रमांना बळकट करण्यासाठी हा ठराव जाहीर करण्यात आला होता.
-
२००८ साली प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला होता.
संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सदस्यता प्राप्त देश: सध्या संयुक्त राष्ट्रांमध्ये १९३ सदस्य देश तर २ निरीक्षक देश आहेत.