• दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'जागतिक विद्यार्थी दिन (World Students’ Day)' जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'जागतिक विद्यार्थी दिन (World Students’ Day)' साजरा करण्यात येतो.

  • माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन (Missile Man)’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची २०२० सालाची ८९ वी जयंती आहे.

जागतिक विद्यार्थी दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • २०१० मध्ये संयुक्त राष्ट्र संघामार्फत १५ ऑक्टोबरला 'जागतिक विद्यार्थी’ दिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले होते.

  • डॉ. कलाम यांच्या विद्यार्थ्यांवरील प्रेमामुळे, समर्पित स्वभावगुणांमुळे तसेच इतर कोणत्याही गोष्टीआधी स्वत:ला त्या भूमिकेत अग्रगण्य ठरवण्याच्या उल्लेखनीय बाबींमुळे हा दिवस त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो.