-
दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस (International Day of Rural Women)' हा जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
ग्रामीण कुटुंबे आणि समुदायांचा टिकाऊपणा सुनिश्चित करणे, ग्रामीण जीवनमान सुधारणे तसेच महिला आणि मुलींच्या महत्त्वपूर्ण भूमिकेस मान्यता देणे अशा महत्वपूर्ण उद्देशांसाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
'कोविड-१९ च्या अनुषंगाने ग्रामीण भागातील महिलांची अनुकूलता वाढवणे (Building rural women’s resilience in the wake of COVID-19)' ही २०२० सालच्या आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवसाची थीम आहे.
-
महिलांचे संघर्ष, गरजा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या दिवसाचे ध्येय आहे.
-
डिसेंबर २००७ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत सदर दिवसाची स्थापना करण्यात आली होती.
-
२००८ साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.
संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.