• दरवर्षी १५ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस (International Day of Families)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • कुटुंबांशी संबंधित मुद्द्यांविषयी जागरूकता वाढविण्याची तसेच कुटुंबांना प्रभावित करणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रविषयक प्रक्रियेचे ज्ञान वाढविण्याची संधी सदर दिवस प्रदान करतो.

  • 'कुटुंबे आणि नवीन तंत्रज्ञान (Families and New Technologies)' ही सदर दिवसाची २०२१ सालाची थीम आहे.

  • १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत ठराव करून निर्णय घेण्यात आला की दरवर्षी १५ मे हा 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस' म्हणून साजरा करण्यात यावा.