• संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी १५ जुलै रोजी 'जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस उद्योजकता कौशल्यांसह तरुणांना सुसज्ज करण्याचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य करतो.

  • 'साथीच्या आजारानंतरचे युवा कौशल्यांबाबतचे पुनर्चित्र (Reimagining Youth Skills Post-Pandemic)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक युवा कौशल्य दिनाची थीम आहे.

  • २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेतर्फे १५ जुलैला 'जागतिक युवा कौशल्य दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.