• देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी आपले बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १५ जानेवारी रोजी 'भारतीय लष्कर दिन (Indian Army Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०२१ सालचा यंदाचा ७३ वा भारतीय लष्कर दिन साजरा होत आहे.

  • आपल्या देशाच्या सैनिकांची नि:स्वार्थ सेवा, बंधुता तसेच देशाबद्दलचे प्रेम या सर्वांचा सन्मान करण्यासाठी लष्कर दिन साजरा केला जातो.

भारतीय लष्कराबाबत (Indian Army) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ एप्रिल १८९५ साली भारतीय लष्कराची स्थापना करण्यात आली होती.

  • चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ: जनरल बिपिन रावत हे सध्या या पदावर आहेत.

  • लष्कर प्रमुख: जनरल मनोज मुकुंद नरवणे हे सध्या या पदावर आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे भारतीय लष्कराच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'स्वतःआधी सेवा (Service Before Self)' हे भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य आहे.

  • भारतीय लष्कर दिन: १५ जानेवारी हा भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो.