-
हिंदी दिन हा दरवर्षी १४ सप्टेंबरला अधिकृत भाषा म्हणून हिंदीच्या लोकप्रियतेसाठी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ अंतर्गत हिंदी भाषा स्विकारण्यात आली आहे.
-
पहिला हिंदी दिन १४ सप्टेंबर १९५३ रोजी साजरा करण्यात आला होता.
-
पंडीत जवाहरलाल नेहरूंनी नंतर सदर दिवस हा देशात हिंदी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
-
भारतीय राज्यघटनेत असणाऱ्या २२ अनुसूचित भाषांपैकी हिंदी आणि इंग्रजी या २ भाषा अधिकृतपणे राष्ट्रीय पातळीवर वापरल्या जातात.
-
हिंदी ही जगातील चौथी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
-
हिंदी दिवस १४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो कारण १९४९ मध्ये या दिवशी भारतीय संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहीलेल्या हिंदीला भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा म्हणून स्विकारले होते.
कलम ३४३ बाबत महत्वपूर्ण माहिती
-
सदर कलमानुसार हिंदी ही देवनागरी लिपीमध्ये बद्ध स्वरूपात संघाची अधिकृत भाषा असेल.
-
यामध्ये असेही म्हटले आहे की अंकांचा वापर आंतरराष्ट्रीय स्वरूपात करण्यात येईल.
-
राज्यघटनेच्या आमलानंतर १५ वर्षांपर्यंत इंग्रजी भाषा ही अधिकृत भाषा म्हणून राहील.
-
१५ वर्षानंतर हिंदी भाषेचा अतिरिक्त अधिकृत भाषा म्हणून वापर करण्याच्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार हे बदलले जाऊ शकते.
-
भारत सरकारमार्फत हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा अधिकृत भाषा म्हणून सध्या वापर करण्यात येत आहे.
८ व्या अनुसूचीबाबत महत्वपूर्ण माहिती
-
भारतीय राज्यघटनेतील ८ व्या अनुसूचीमध्ये २२ अनुसूचित भाषांना राज्यांची अधिकृत भाषा म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे.
-
राज्यांना अनुसूचित भाषांमधून आपली अधिकृत भाषा निवडण्याची सक्ती करण्यात आलेली नाही.
-
अनुसूचीमध्ये समाविष्ट २२ भाषा पुढीलप्रमाणे आहेत: आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगू, ऊर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी.