• 'जागतिक मानक दिन (World Standards Day)' किंवा 'आंतरराष्ट्रीय मानक दिन (International Standards Day)' दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • ग्राहक, नियामक आणि उद्योग विभाग यांच्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमधील मानकीकरणाच्या महत्वाविषयी जागरूकता वाढविणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'मानकांसह ग्रहाचे संरक्षण करणे (Protecting the planet with standards)' ही २०२० सालच्या जागतिक मानक दिनाची थीम आहे.

जागतिक स्तरावरील काही महत्वपूर्ण मानके

  • आंतरराष्ट्रीय मानक संघटना (International Organisation for Standards - ISO)

  • इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (Institute of Electrical and Electronics Engineers - IEEE)

  • आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन संघ (International Telecommunication Union - ITU)

  • अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (American Society of Mechanical Engineers - ASME)

ISO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ISO म्हणजेच International Organisation for Standards अर्थात आंतरराष्ट्रीय मानक संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनीव्हा, स्वित्झर्लंड हे ISO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: युनायटेड किंगडममधील लंडन येथे २३ फेब्रुवारी १९४७ रोजी ISO ची स्थापना झाली होती.

  • सध्याचे अध्यक्ष: एडी एनजोरोजे हे सध्या ISO च्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • सदस्य देश: सध्या ISO चे १६४ सदस्य देश आहेत.