• दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी 'जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मधुमेह ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी परिचारिका कोणत्या स्वरूपाची भूमिका घेतात याविषयी जागरूकता वाढविणे हे सदर मोहीमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'परिचारिका आणि मधुमेह (The Nurse and Diabetes)' ही जागतिक मधुमेह दिन २०२० ची थीम आहे.

  • २००७ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत १४ नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.