-
दरवर्षी १४ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन (National Energy Conservation Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा ऊर्जा मंत्रालयांतर्गत ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरो (Bureau of Energy Efficiency - BEE) द्वारा दरवर्षी साजरा करण्यात येतो.
-
ऊर्जा बचतीचे महत्त्व पटवून देणे, ऊर्जा कार्यक्षमतेच्या दृष्टीने सर्वांगीण प्रयत्न करणे आणि सर्वांगीण विकासाबाबत जनजागृती करणे या उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.
BEE बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BEE म्हणजेच Bureau of Energy Efficiency अर्थात ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरो होय.
-
संस्था विशेष: BEE ही एक घटनात्मक संस्था आहे जी भारत सरकारच्या अखत्यारीमध्ये येते.
-
संस्थेचा उद्देश: ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी धोरण राबवून त्यांचा विकास करण्यास मदत करणे हा सदर संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
-
स्थापना वर्ष: २००२ साली BEE ची स्थापना करण्यात आली होती.