• दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन (International Day for Disaster Reduction)' हा संयुक्त राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा जोखीम-जागरूकता आणि जागतिक आपत्ती निवारण संस्कृतीला चालना देण्यासाठी साजरा करण्यात येतो.

  • सदर आंतरराष्ट्रीय दिन १९८९ साली सुरू करण्यात आला होता.

संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.