-
'जागतिक रेडिओ दिन (World Radio Day)' दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सध्याच्या घडीला रेडिओ हे एक शक्तिशाली माध्यम म्हणून ओळखले जाते.
-
विविधतेला चालना देण्याचे तसेच अधिक सर्वसमावेशक जग घडविण्यात मदत करण्यासाठी लोकांना एकत्र आणण्याचे कार्य रेडिओ करतो.
-
'नवीन विश्व, नवीन रेडिओ (New World, New Radio)' जागतिक रेडिओ दिन २०२१ ची थीम आहे.
-
२०११ मध्ये युनेस्कोच्या सदस्य देशांमार्फत सदर दिवस जाहीर करण्यात आला होता.
-
२०१२ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेने हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून स्विकारल्यानंतर १३ फेब्रुवारी हा 'जागतिक रेडिओ दिन (World Radio Day)' म्हणून मानण्यात आला.
UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.