• भारतात दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय महिला दिन (National Women’s Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी झाला होता.

  • यंदा २०२१ साली त्यांची १४२ वी जयंती साजरी करण्यात येत आहे.

  • त्यांच्या कवितांमुळे त्या ‘नाईटिंगेल ऑफ इंडिया (Nightingale of India)’ किंवा ‘भारत कोकिळा’ या टोपण नावाने प्रसिद्ध होत्या.

  • स्वातंत्र्यसेनानी असण्यासोबतच त्या सध्याच्या उत्तर प्रदेशातील संयुक्त प्रांताच्या पहिल्या महिला राज्यपालही बनल्या होत्या.