-
'आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठीचा दिन (International Day for South-South Cooperation)' दरवर्षी १२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
हा दिवस संयुक्त राष्ट्रांमार्फत साजरा केला जातो.
-
दक्षिणेतील प्रदेश तसेच देशांनी अलिकडे केलेल्या आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय घडामोडींची दखल घेण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.