-
दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day - IYD) साजरा करण्यात येतो. तरुणांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
ठळक मुद्दे
-
आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२० 'जागतिक कृतीसाठी युवकांचा सहभाग (Youth Engagement for Global Action) या थीमअंतर्गत साजरा करण्यात येईल.
-
युवकांना सहभागी करून घेण्याच्या मार्गांना प्रोत्साहन द्यावे आणि सकारात्मक योगदानाद्वारे त्यांना त्यांच्या समुदायात अधिक सक्रियपणे सामील करावे हे सदर दिवसाचे उद्दिष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय युवा दिन: ऐतिहासिक बाबी
-
१९९९ मध्ये आमसभेमार्फत युवा वर्गासाठी जबाबदार असणाऱ्या मंत्र्यांच्या जागतिक परिषदेने केलेल्या शिफारसीचे समर्थन केले की १२ ऑगस्टला 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' म्हणून घोषित करण्यात यावे.
-
१२ ऑगस्ट २००० रोजी हा दिवस पहिल्यांदा पाळला गेला होता.
-
हा दिवस जागृती दिन म्हणून उल्लेखला जातो.
-
तरूणांच्या सांस्कृतिक आणि कायदेशीर समस्यांकडे लक्ष वेधण्याचे कार्य या दिवसाच्या माध्यमातून पार पाडले जाते.