• जखम होण्यापासून रोखण्यासाठी तसेच जीव वाचवण्यासाठी प्रथमोपचाराचे महत्त्व जाणून घेण्याप्रती जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी जागतिक प्रथमोपचार दिन साजरा केला जातो.

ठळक मुद्दे

  • इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अँड रेड क्रेसेंट सोसायटीमार्फत (International Federation of Red Cross and Red Crescent Societies - IFRC) याचा आरंभ करण्यात आला होता.

  • जगातील लोकांना प्रथमोपचाराचे फायदे, प्रथमोपचाराची गरज आणि प्रथमोपचार करण्याच्या योग्य पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी २००० साली या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती.