• 'बालमजुरीविरूद्ध जागतिक दिवस (World Day Against Child Labour)' दरवर्षी १२ जून रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • 'कृती करा: बालमजुरी संपवा ! (Act now: End child labour!)' ही यंदाच्या २०२१ सालच्या बालमजुरीविरूद्ध जागतिक दिवसाची थीम आहे.

  • आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेमार्फत २००२ मध्ये सदर दिवसाचे अनावरण करण्यात आले होते.

ILO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ILO म्हणजेच International Labour Organization अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे ILO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९१९ साली ILO ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्य महासंचालक: गाय रायडर हे सध्या मुख्य महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • संस्थेचा प्रकार: संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी या स्वरूपात ILO सध्या कार्यरत आहे.

  • सदस्यत्व: ILO चे सध्या १८७ सदस्य देश आहेत.

ILO प्रशासकीय मंडळाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • संस्थेचे स्वरूप: प्रशासकीय मंडळ (Governing body) ही ILO ची सर्वोच्च कार्यकारी संस्था या स्वरूपात कार्यरत आहे.

  • संस्थेची कार्ये: धोरणे, कार्यक्रम, अजेंडा, बजेट ठरवणे आणि महासंचालकांची निवड करणे इ. महत्वपूर्ण कार्ये प्रशासकीय मंडळामार्फत पार पाडण्यात येतात.

  • बैठक कालावधी: वर्षातून ३ वेळा मंडळाची बैठक घेण्यात येते.