• स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस भारत सरकारमार्फत १९८४ मध्ये जाहीर करण्यात आला होता आणि १९८५ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.

  • देशभरातील विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांचे जीवन, कल्पना तसेच तत्त्वज्ञान जाणून स्वतःच्या जीवनात लागू करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या दिवसामागील मुख्य हेतू आहे.

  • २०२१ मध्ये स्वामी विवेकानंदांची १५८ वी जयंती साजरी करण्यात येत आहे.

  • ‘राष्ट्र घडविण्यासाठी युवा शक्ती मार्गक्रमित करणे (Channelizing Youth Power for Nation Building)’ ही राष्ट्रीय युवा दिन २०२१ ची थीम आहे.