• दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी भारतात 'राष्ट्रीय उत्पादकता दिन (National Productivity Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • देशातील सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादकता तसेच दर्जेदार गुणवत्तेला उत्तेजन देणे हे राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • राष्ट्रीय उत्पादकता परिषदेमार्फत (National Productivity Council - NPC) सदर दिवस हा भारतातील उत्पादक संस्कृतीला चालना देण्यासाठी साजरा करण्यात येत आहे.

NPC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NPC म्हणजेच National Productivity Council अर्थात राष्ट्रीय उत्पादकता परिषद होय.

  • महासंचालक: अरुण कुमार झा हे सध्या NPC च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना: १९५८ साली NPC ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NPC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.