• दरवर्षी १२ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन (International Day of Neutrality)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय नात्यातील तटस्थतेच्या मूल्याबाबत जनजागृती करण्यासाठी सदर दिवस हा संयुक्त राष्ट्रामार्फत मान्यता प्राप्त आहे.

  • फेब्रुवारी २०१७ मध्ये याबाबत अधिकृतपणे संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ठरावाने घोषित करण्यात आले होते.

  • १२ डिसेंबर २०१७ रोजी पहिल्यांदा हा दिवस पाळण्यात आला होता.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.