• भारतात दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • मौलाना आझाद यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देण्याच्या उद्देशाने सदर दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

  • २००८ साली मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत (Ministry of Human Resource Development - HRD) ११ नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती.

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मौलाना आझाद यांचे शिक्षण, राष्ट्र-निर्माण आणि संस्था-निर्माण या क्षेत्रातले योगदान बहुमोल स्वरूपाचे आहे.

  • भारतातील शिक्षणाचे मुख्य शिल्पकार म्हणून त्यांनी आपली भूमिका बजावली आहे.

  • १९४७ ते १९५८ या कालावधीमध्ये त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता.

  • १९९२ साली त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.