• 'विज्ञान क्षेत्रामधील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Women and Girls in Science)' ११ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधील महिला तसेच मुलींच्या महत्वपूर्ण भूमिकेची दखल घेण्यासाठी सदर साजरा केला जातो.

  • डिसेंबर २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रामार्फत ११ फेब्रुवारीला विज्ञानातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

  • युनेस्को (UNESCO) आणि यूएन-महिला (UN-Women) यांच्यामार्फत मुलींना विज्ञानात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यरत संस्थांच्या सहकार्याने सदर दिवस आमलात आणला गेला.

  • 'कोविड - १९ विरुद्धच्या लढ्यात अग्रणी महिला वैज्ञानिक (Women Scientists at the forefront of the fight against COVID-१९)' ही सदर दिवसाची २०२१ सालाची थीम आहे.

  • २०१६ साली हा दिवस पहिल्यांदाच साजरा करण्यात आला होता.

  • विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (Science, Technology, Engineering and Mathematics - STEM) इ. क्षेत्रांमध्ये महिला आणि मुलींचा समान सहभाग निश्चित करणे ही या दिवसामागील मुख्य कल्पना आहे.