• केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय दरवर्षी १० ऑगस्ट रोजी जागतिक जैवइंधन दिन साजरा करते.

ठळक मुद्दे

  • मंत्रालयामार्फत या प्रसंगी 'आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जैवइंधन (Biofuels towards Atmanirbhar Bharat)' या थीमसह वेबिनार देखील आयोजित करण्यात आला होता.

  • जागतिक जैवइंधन दिन हा पारंपारिक जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून जीवाश्मरहित इंधनांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी दरवर्षी साजरा करण्यात येतो.

  • सरकारमार्फत जैवइंधन क्षेत्रात करण्यात आलेल्या विविध कृतींवर सदर दिवस प्रकाश टाकण्याचे कार्य करतो.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री: धर्मेंद्र प्रधान हे सध्या केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे मंत्रालयाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.