-
'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (World Suicide Prevention Day - WSPD)' दरवर्षी १० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
'आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक संघटनेमार्फत (International Association for Suicide Prevention - IASP)' सदर दिवस साजरा केला जातो.
-
आत्महत्या हा पर्याय नसून ती टाळता येऊ शकते याबाबत जागरूकता निर्माण करणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
'कृतीद्वारे आशा निर्माण करणे (Creating hope through action)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची' थीम आहे.
-
२००३ सालापासून सदर दिवसाचे आयोजन करण्यात येत आहे.