• दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जागतिक स्तरावरील मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी जागरूकता वाढविणे आणि मानसिक आरोग्याच्या समर्थनार्थ केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना एकत्रित करणे या महत्वपूर्ण उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'जागतिक मानसिक आरोग्य संघटनेमार्फत (World Federation for Mental Health)' जागतिक मानसिक आरोग्य दिन आयोजित करण्यात येतो.

  • ‘सर्वांसाठी मानसिक आरोग्य (Mental Health for All)’ ही २०२० च्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम आहे.

  • जागतिक मानसिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने सदर दिवस १९९२ साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.

जागतिक मानसिक आरोग्य संघटनेबाबत (World Federation for Mental Health) महत्वपूर्ण माहिती

  • अध्यक्ष: इंग्रीड डॅनिएल्स हे सध्या संघटनेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४८ साली जागतिक मानसिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली होती.