-
'शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन (World Science Day for Peace and Development)' दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
विज्ञानाच्या समाजातील महत्त्वाच्या भूमिकेबद्दल आणि उदयोन्मुख वैज्ञानिक मुद्द्यांबाबत लोकांना गुंतवून घेण्याच्या गरजेवर प्रकाश टाकण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
'समाजासाठी आणि समाजासह विज्ञान (Science for and with Society)' ही शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन २०२० ची थीम आहे.
-
युनेस्कोद्वारे २००१ मध्ये सदर दिवस जाहीर करण्यात येऊन २००२ मध्ये प्रथमच साजरा करण्यात आला होता.
UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.