-
संयुक्त राष्ट्र संघामार्फत नियुक्त करण्यात आलेला 'जागतिक डाळी दिवस (World Pulses Day)' दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
जागतिक अन्न म्हणून डाळींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेमार्फत (Food and Agriculture Organization - FAO) सदर दिवसाची स्थापना करण्यात आली आहे.
-
'शाश्वत भविष्यासाठी पौष्टिक बियाणे (Nutritious Seeds for a Sustainable Future)' ही २०१६ सालाची थीम २०१९ ते २०२१ पर्यंत समान राहिली आहे.
FAO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FAO म्हणजेच Food and Agriculture Organization अर्थात अन्न व कृषी संघटना होय.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली FAO ची स्थापना करण्यात आली होती.
-
संस्थेचे प्रमुख: क्यू डोंग्यू हे सध्या संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: रोम, इटली हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.