• दरवर्षी १० डिसेंबर रोजी जगभरात 'जागतिक मानवाधिकार दिन (World Human Rights Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्राने मानवाधिकारांची सार्वत्रिक घोषणा (Universal Declaration of Human Rights - UDHR) स्वीकारली तेव्हा सदर दिवस अस्तित्वात आला होता.

  • सदर दिवस जगभरात दरवर्षी साजरा करण्यात येतो जो आपल्या सर्वांना सामर्थ्य प्रदान करतो.

  • जगभरातील मानवी हक्कांचे समर्थक आणि संरक्षणकर्ते यांना देखील हा दिवस मान्यता प्रदान करतो.

  • २०२० सालाची मानवाधिकार दिनाची थीम 'चांगली पुनर्प्राप्ती - मानवी हक्कांसाठी सज्ज रहा (Recover Better – Stand Up for Human Rights)' ही आहे.

UDHR बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UDHR म्हणजेच Universal Declaration of Human Rights अर्थात मानवाधिकारांची सार्वत्रिक घोषणा होय.

  • ठळक वैशिष्ट्य: UDHR हा एक महत्वपूर्ण दस्तऐवज आहे जो वंश, रंग, धर्म, लिंग, भाषा, राजकीय तसेच राष्ट्रीय किंवा सामाजिक मूळ, मालमत्ता, जन्म किंवा अन्य स्थितीचा विचार न करता प्रत्येकाला माणूस म्हणून असलेल्या हक्कांची घोषणा करतो.