-
'जागतिक सिंह दिन (World Lion Day)' दरवर्षी १० ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सिंहांच्या संवर्धनासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांविषयी जागृती निर्माण करणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
२०१३ मध्ये पहिल्यांदा 'जागतिक सिंह दिनाचे' अनावरण करण्यात आले होते.
IUCN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IUCN म्हणजेच International Union for Conservation of Nature अर्थात आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: ग्लॅण्ड, स्वित्झर्लंड हे IUCN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: झाँग झिंगसेंग हे सध्या IUCN च्या अध्यक्षपदावर आहेत.
-
महासंचालक: डॉ. ब्रुनो ओबर्ले हे सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
संस्थापक: ज्युलियन हक्सले हे IUCN चे संस्थापक आहेत.
-
स्थापना वर्ष: ५ ऑक्टोबर १९४८ रोजी IUCN ची स्थापना करण्यात आली होती.