• दरवर्षी १० एप्रिल रोजी 'जागतिक होमिओपॅथी दिन (World Homeopathy Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • होमिओपॅथीविषयी जागरूकता वाढविणे तसेच औषध जगतातील त्याच्या योगदानाचे वर्णन करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • होमिओपॅथी औषध प्रणालीचा जनक मानला जाणाऱ्या जर्मन फिजीशियन डॉ. क्रिस्टियन फ्रेडरिक सॅम्युअल हॅन्नेमन यांच्या जयंतीदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो.

  • २०२१ वर्ष हॅन्नेमन यांचे २६६ वे जन्मतिथी वर्ष आहे.