जागतिक आरोग्य संघटनेचा 'जागतिक लसीकरण दिन (World Immunization Day)' दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सर्व वयोगटांतील लोकांसाठी लसींची उपलब्धता सुनिश्चित करणे या मुख्य उद्देशाने दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी हा दिवस पाळला जातो.
  • २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'प्रत्येक पिढीसाठी, लसी प्रभावी ठरतात (For every generation, vaccines work)' ही यंदाच्या २०२६ सालची या दिवसाची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • जागतिक आरोग्य सभेच्या पुढाकारानंतर १९७४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेमार्फत 'विस्तारित लसीकरण कार्यक्रम (Expanded Programme on Immunization)' सुरू करण्यात आला होता.
  • पहिला जागतिक लसीकरण दिन १० नोव्हेंबर २०१२ रोजी साजरा करण्यात आला होता .