-
'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (International Day of Older Persons)' दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
वृद्धांना प्रभावित करणाऱ्या समस्यांबाबत जागरूकता वाढवणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
'सर्व वयोगटासाठी डिजीटल समानता (Digital Equity for All Ages)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाची' थीम आहे.
-
१९९० मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत १ ऑक्टोबर हा 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.