-
संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत दरवर्षी १ मार्च रोजी 'शून्य भेदभाव दिन (Zero Discrimination Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
वय, लिंग, लैंगिकता, राष्ट्रीयत्व, वांशिकता, रंग याशिवाय प्रत्येकाच्या अधिकारांचा प्रचार करणे तसेच उत्सव साजरा करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
प्रत्येकाच्या आवडीनिवडी असूनही त्यांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारासाठी आवाज उठविणे हा 'शून्य भेदभाव दिनाचा' मुख्य उद्देश आहे.
-
'असमानता संपवा (End Inequalities)' ही यंदाच्या शून्य भेदभाव दिन २०२१ ची थीम आहे.
-
'फुलपाखरू' हे शून्य भेदभाव दिनाचे प्रतीक आहे.