-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स अॅक्ट (Payment and Settlement Systems Act), २००७ चे उल्लंघन केल्याबद्दल पंजाब नॅशनल बँकेला (Punjab National Bank - PNB) १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
पंजाब नॅशनल बँक एप्रिल २०१० पासून भूटानमधील ड्रुक पीएनबी बँक लि. बरोबर द्विपक्षीय एटीएम-सामायिकरण व्यवस्था चालवित आहे हे नुकतेच निदर्शनास आले आहे.
-
RBI ने 'पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स अॅक्ट (Payment and Settlement Systems Act - PSS Act), २००७' संदर्भित उल्लंघनासाठी १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पंजाब नॅशनल बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे PNB च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: एस. एस. मल्लिकार्जुन राव हे या पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १८९४ मध्ये पाकिस्तानमधील लाहोर येथे पंजाब नॅशनल बँकेची स्थापना करण्यात आली होती.
-
बँकेचे संस्थापक: लाला लाजपत राय आणि दयालसिंह मजीठिया हे PNB चे संस्थापक आहेत.