-
देशभरात मुस्लिम महिला हक्क दिन १ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. एका मुस्लीम व्यक्तीला एकाच जागी तीन वेळा तलाक शब्दाचा उच्चार करून घटस्फोट घेण्याच्या प्रथेवर बंदी घालून कारावासाच्या शिक्षेची तरतूद सदर विधेयकातील तरतुदींनुसार अधोरेखित केली आहे.
ठळक मुद्दे
-
१ ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला हक्क दिन भारतात साजरा केला जातो. सदर दिवस हा त्वरित तिहेरी तलाकविरूद्ध निर्मित कायद्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येतो
-
या दिवसाचे औचित्य साधून केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी व्हर्च्युअल कॉन्फरन्स माध्यमाद्वारे मुस्लिम महिलांना संबोधित केले.
मुस्लिम महिला (विवाहावरील हक्कांचे संरक्षण) विधेयक, २०१९ बाबत थोडक्यात
-
मुस्लिम महिला (विवाहावरील अधिकारावर संरक्षण) विधेयक,२०१९ मंजूर झाल्याने तिहेरी तलाक जाहीर करणे दंडनीय असेल आणि पोलीस आरोपीला वॉरंटशिवाय अटक करू शकतात
-
सदर विधेयकातील तरतुदींनुसार एका मुस्लीम व्यक्तीला एकाच जागी तीन वेळा तलाक शब्दाचा उच्चार करून घटस्फोट घेण्याच्या प्रथेवर बंदी घालून कारावासाच्या शिक्षेची तरतूद अधोरेखित केली आहे.
-
विधेयकात असेही म्हटले गेले आहे की जर एखाद्या महिलेने प्रस्तुत कायद्याचा गैरवापर केला तर पुरुषाला अपील करण्याचा अधिकार असावा
-
सदर विधेयकाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे मुस्लिम पुरुषांकडून होणाऱ्या त्वरित घटस्फोटाच्या प्रथेस प्रतिबंध करणे होय