-
दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान 'जागतिक स्तनपान सप्ताह (World Breastfeeding Week - WBW)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
माता तसेच अर्भकांसाठी स्तनपानाच्या महत्वाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'स्तनपान वाचवा: एक सामायिक जबाबदारी (Protect Breastfeeding: A Shared Responsibility)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक स्तनपान सप्ताहाची थीम आहे.
-
स्तनपानासाठी जागतिक आघाडी (World Alliance for Breastfeeding - WABA), जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization - WHO) आणि युनिसेफ (UNICEF) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर सप्ताहाचे १९९१ सालापासून आयोजन करण्यात येते.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.
-
महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
UNICEF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNICEF म्हणजेच United Nations International Children's Emergency Fund अर्थात संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी होय.
-
कार्यकारी संचालक: हेनरीटा एच. फोर सध्या UNICEF च्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UNICEF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.